सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा !
हे स्वप्न देशाचे स्थापत्य अभियंतेच पूर्ण करू शकतात – वास्तुअभियंता प्रा. रमेश गोटखडे
अमरावती प्रतिनिधी –
जगाकडे पाहतांना “सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा” हे स्वप्न देशाचे स्थापत्य अभियंतेच पूर्ण करू शकतात इतर देशाच्या तंत्रज्ञानचीही आम्हाला गरज नाही असे मत “ देशप्रेमी पुरस्कार प्राप्त ” वास्तुअभियंता प्रा. रमेश गोटखडे यांनी व्यक्त केले.
थोर अभियंते भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जन्म दिनी असोसीएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजीनिअर्स, अमरावती. (ऐ.सी.सी.ई) च्या वतीने नुकताच संपन्न झालेल्या अभियंता दिनानिमित्त्य आयोजित समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडनेरा इंजिनीरिंग कॉलेज चे प्रा. ए. पी. डांगे सर तर प्रमुख अतिथी म्हणून म.न.पा. चे नगर रचना सहाय्यक संचालक मा. गिरीश आगरकर उपस्थित होते.
ऐ.सी.सी.ई चे अध्यक्ष इंजी. मनीष राउत, उपाध्यक्ष इंजी. मिलिंद चिखलकर, सचिव इंजी. किशोर क्षीरसागर, कोषाध्यक्ष इंजी. शेख अकिल, सहसचिव इंजी. संजय धामंदे, इंजी. प्रदीप शिरभाते, इंजी. चेतन सुने, इंजी. सुधाकर यावले, इंजी. गोपाल इंगळे, इंजी. प्रतिक गोटखडे, इंजी. योगेश कावरे, आदींनी प्रयत्न करून समारंभ यशस्वी केला.
समारंभात प्रा. ऐ. पी. डांगे सरांचे तसेच मा. आगरकर साहेबांचेही भाषणे झालीत. प्रास्ताविक व संचालन इंजी. किशोर क्षीरसागर यांनी केले; तसेच आभार मानले. भरगच्च भरलेल्या समारंभात भाषण करतांना मा. गिरीश आगरकर यांनी म.न.पा. मध्ये कन्सल्टिंग इंजिनिअर्स करिता “भव्य कन्सल्टिंग इंजिनिअर्स चेंबर” ची निर्मिती म.न.पा. कडून केल्या जाईल असे जाहीर केले हेहि विशेष.
महानगरातील ऐ.सी.सी.ई, अमरावती. एक प्रभावी व्यासपीठ असून अभियंत्यांनी बहुसंख्येनी या व्यासपीठावर यावे असे आवाहनही प्रा. ए. पी. डांगे सर यांनी यावेळी केले. सभागृहात म.न.पा. अभियंता खडेकार, अभियंता अविनाश रघताटे, अभियंता महाजन, अभियंता मांडवे, वरिष्ठ लिपिक साभद्राजी, वरिष्ठ लिपिक सवाई, लिपिक दारव्हेकर, वऱ्हाडे व ऑटो डी सी आर चे व्यवस्थापक धनंजय दाभारे, प्रवीण कोळेश्वर आदी म.न.पा. कर्मचारी उपस्थित होते
अभियंता प्रतिक गोटखडे दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - भारतासारख्या विकसनशील देशात इमारती उभारतांना कला आणि उपयुक्तता यांचा समन्वय साधता आला पाहिजे त्यासाठी पारंपारिक वास्तुकलेची जाणीव ठेऊन अतिशय रचनात्मकतेने नवे डिझाईन तयार करणे व आधुनिक वास्तुशास्त्रानुसार घरांची स्वप्ने साकारणारी माणसं म्हणून ओळखल्या जाणारे येथील गोटखडे इंजिनिअर्स अँड बिल्डर्सचे चेअरमन तथा मेनेजिंग डायरेक्टर अभियंता प्रतिक गोटखडे यांचा नुकताच दिल्ली येथे "इंडीयन कन्सट्रक्शन अँड डिझाईन अवार्ड" या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
भारतीय जडण घडण आणि आराखडा यात विशेष प्राविण्य निर्माण करणाऱ्यांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार नवी दिल्ली येथील इंडियन इकोनॉमिक अँड डेव्हलोपमेंट रिसर्च असोसिऐशन, च्या वतीने देण्यात येतो.
पुरस्कार प्राप्त करणारे युवा अभियंता प्रतिक गोटखडे हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या महानगराचे असल्यामुळे सर्वांचे विशेष लक्ष लागून होते हा राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथील इंडिअन हबिटेट सेंटर येथे एका भव्यदिव्य समारंभात केंद्रीय मंत्री डॉ. मणिशंकर अय्यर, सी. बी. आय. प्रमुख सरदार जोगिंदर सिंग, भारताचे निवडणूक आयुक्त डॉ. जी. बी. कृष्णमुर्ती, केंद्रीय मंत्री तथा गव्हर्नर डॉ. भीष्म नारायण सिंग, ओ. पी. वर्मा गव्हर्नर तथा माजी मुख्य न्यायाधीश, काँग्रेस मुख्य सेक्रेटरी मेजर वेद प्रकाश, रंजन ओबेरॉय जनरल सेक्रेटरी आय.ई.डी.आर.ऐ. दिल्ली यांचे हस्ते संयुक्तरित्या अभियंता प्रतिक गोटखडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे येथील सुप्रसिद्ध वास्तुअभियंता प्रा. रमेश गोटखडे हे अभियंता प्रतिक गोटखडे यांचे वडील आहे हे येथे उल्लेखनिय आहे.